🔸राहुल सूर यांची कारागृहात रवानगी
मारेगाव : प्रतिनिधी
मागील पाच तारखेला जिल्हा परिषद सदस्यास दगडाने मारहाण करणारा संशायित आरोपी राहुल सूर गुरुवारला रात्री त्याच्या घरून पोलिसांनी ताब्यात घेतले.आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची यवतमाळ कारागृहात रवानगी करण्यात आली.
मारेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर यांना वेगाव येथे मागील पाच तारखेला मारेगाव येथील युवक राहुल सूर याने दगडाने मारहाण करून घटनास्थळारून पोबारा केला होता. जखमी देरकर यांना डोक्याजवळ सात टाके लागले होते.पायालाही इजा झाली होती.पोलिसांत तक्रार दाखल होताच सूर याचेवर गुन्हा दाखल झाला.पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरविले.दरम्यान संशायितांने तब्बल सात दिवस नागपूर येथे लॉज मध्ये ठाण मांडले होते.
अखेर जवळची रक्कम संपताच तब्बल सात दिवसानंतर गुरुवारला रात्री राहुल सूर हा मारेगाव शांती नगर स्थित निवासी आला.मारेगाव पोलीस पाळत ठेवून असतांना उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुल्लजवार यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांनी बीट जमादार आनंद आलचेवार , नितीन खांदवे,अजय वाभीटकर,भालचंद्र मांडवकर यांच्या पथकाने छापा टाकीत ताब्यात घेतले. सूर यास पोलिसांनी आज शुक्रवारला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.