🔸देऊरवाडा (ढाकोरी) येथील घटना
वणी:- प्रतिनिधी
तालुक्यातील देऊरवाड येथील 52 वर्षे शेतकऱ्यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 14 नोव्हेंबर रोजी साडेतीन वाजता उघडकीस आलीदिनकर बालाजी डाहुले 52 वर्ष असे मूर्तक शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील वर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंड आळी ने आक्रमण केल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले .यंदाही अपेक्षित उत्पन्ननाची आशा असताना निराशा झाली .त्यामुळे सावकारी व इतर कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असल्याची चर्चा आहे .दोन दिवसा नंतर नातवाचा जन्मदिवस आल्याने घरी नातेवाईकाची गर्दी होती .मात्र आजोबां दिनकर यांनी विवेनचनेत शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याचा मागे पत्नी तीन ,मुली , नातवंड असा आप्त परिवार आहे .त्याचा आत्महत्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.