🔸नगरपंचायतचा तुघलकी कारभार कारणीभूत
🔸दिवाळीनंतर वाजणार नगरपंचायतीचे तुणतुणे
मारेगाव : दीपक डोहणे
पहिल्या पंचवार्षिक ची मुदत संपून किमान वर्षभराचा कालावधी लोटल्यानंतर प्रशासनाचा विकासाच्या नावावर शहरात बेतालपणा सर्रासपणे सुरू आहे.छोट्या मोठ्या कामात रोजगार हमी अर्धे तुम्ही अर्धे आम्ही ची प्रचिती येत आहे. नाली सफाईचे काम रेंगाळत असतांना दुर्घन्धीयुक्त घाण, डासांचा प्रादुर्भाव, अल्पावधीत बनलेली रस्त्यांची केविलवाणी स्थिती, स्मशानभूमीतील सुविधांचा अभाव यामुळे आरोग्यासह वेगवेगळ्या समस्यांचा डोंगर शहरात उभा होतो आहे.शहराच्या विकासाची आस शहर होतोय भकास अशा विदारक स्थितीला नगरपंचायत जबाबदार असल्याची चर्चा आता जोर पकडत आहे.
मागील वर्षभरापासून वेगवेगळ्या कामाचे टेंडर निवडक कर्मचाऱ्यांच्या हातचे खेळणे बनले असतांना हे टेंडर गुपित पणे बिरागरीतील माणसालाच कसे देता येईल यासाठी जोरकस प्रयत्न होतांना दिसते आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याने यासाठी चंग बांधल्याची चर्चा शहरा सभोवताल खमंगपणे सुरू आहे.
मात्र नागरिकांना आवश्यक सुविधेपासून कोसो दूर ठेवत मलिंदा लाटण्याचा जोरकस प्रयत्न जलदगतीने चालविला आहे.रस्ते , नाली, केरकचरा, स्मशानभूमीत गैरसोय,शहरातील फवारणी आदी समस्या डोके वर काढीत आहे.नागरिकांचे नव्हे तर कर्मचारी व निवडक कंत्राटदार यांचे अच्छे दिन सुरू असतांना शहराच्या विकासाला पुरती खीळ बसून येथील नागरिकांवर प्रशासनाच्या बेतालपणाने बुरे दिन आले आहे.
शहरातील विविधांगी प्रश्न प्रलंबित असतांना याला वाचा फोडण्यासाठी नागरिक आता आंदोलनाच्या तयारीला लागले आहे.नगरपंचायत प्रशासनाचे पालेमुळे जनतेसमोर आणण्यासाठी आणि विकास कामाच्या गुणवत्तेची यादीच नागरिकांच्या समोर ठेवण्यासाठी अवघ्या दिवसात सामाजिक कार्यकर्ते आकाश भेले व इतर नागरिकांनी आंदोलनाची जोरदार तयारी चालविली आहे.या आंदोलनाने प्रशासनाचे पुढील आठवड्यात तुणतुणे वाजणार आहे.यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी यांचेकडे करण्यात आली आहे.