🔸उपसरपंच प्रवीण व पत्रकार जयप्रकाश वनकर यांना मातृशोक
मारेगाव। : प्रतिनिधी
तालुक्यातील बोटोणी येथील सामाजिक कार्यकर्त्या गीता शंकर वनकर (६७) यांचे अल्पशा आजाराने आज मंगळवारला दुपारी चार वाजताचे दरम्यान निधन झाले.आयुष्यमती गीता यांना मागील तीन दिवसापूर्वी पक्षाघात आजार झाला होता.त्यांचेवर उमरी येथील उपचार सुरू असतांना उपचाराला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता सेवाग्राम हलवितांना वाटेत गीताताई यांनी दुपारी अखेरचा श्वास घेतला.
उद्या बुधवारला सकाळी नऊ वाजता त्यांचेवर बोटोणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या 'विदर्भ सर्च न्यूज' चे बोटोणी येथील बातमीदार जयप्रकाश व बोटोणी ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रवीण वनकर यांच्या आई होत.
स्मृतीशेष
गीताताई वनकर यांच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी , नातवंड असा आप्तपरिवार आहे.