🔸सापडलेला मोबाईल केला साभार परत..
🔸 सुभाष जांगडे चा प्रामाणिकपणा ठरला गौरवास पात्र !
मारेगाव : दीपक डोहणे
मतलबी दुनियेत 'प्रामाणिक' हा शब्दच अनेकांच्या शब्दकोशातून गायब झाल्याचे अलीकडच्या काळात दिसून येतंय.एखादी बऱ्यापैकी किमतीची वस्तू अथवा पैसा सापडला की 'नियत' बदललेली मानसे गेली कुठे म्हणून शोधशोध सुरू होते.अर्थात पैशासाठी व वस्तूसाठी मैत्रीत , नातेगोत्यातील अनेकजण वाट्टेल ते करतात.अशामध्ये आपण प्रामाणिकपणा विसरून गेलो. मात्र प्रामाणिकपणा आजही जिवंत आहे याचा प्रत्यय मारेगावात आलाय.तो मेघदूत कॉलनी चिखलगाव (वणी)येथील सुभाष जांगडे या अँटोचालक नावाच्या व्यक्तीमुळे.
सविस्तर असे की , मारेगाव तालुका कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष धर्मराज सातपुते यांचा चिरंजीव रोहित हा शनिवारी दुपारी एक वाजताचे सुमारास दुचाकीने मार्डी रोडने जात असतांना पोलीस स्टेशन समोरील गतिरोधक जवळ त्याच्या खिशातून रेड मी नोट 9 प्रो मॅक्स हा १८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अलगद खाली पडला.यत्किंचितही मोबाईल कडे नजर न जाता रोहित याच्या घरी गेल्यानंतर मोबाईल पडल्याची बाब लक्षात आली.मात्र तोपर्यंत बराच उशीर झाल्याने दोन मुलासह वडिलांची शोधाशोध सुरू झाली.सदर मोबाईल हा लोकेशन ट्रँकवर टाकण्यात आला.यावेळी पेट्रोल पंप राज्य महामार्ग वणी रोड लोकेशन दाखविण्यात येत होते.अत्यल्प वेळात रिंग जाणारा मोबाईल काही वेळात स्वीच आँफ दाखवित असल्याने मोबाईल मिळण्याची आशा मावळली.सदरील मोबाईल मध्ये रोहितच्या बी- टेक इंजिनिअरिंग अभ्यासक्रम संग्रहित असल्याने त्याचा जीव कासावीस होत होता.त्यामुळे बापलेकांनी पोलिसात धाव घेतली.तक्रारी नंतर बीट जमादार अलचेवार तात्काळ शोध मोहीम राबविली.वणी येथे सायबरकँफेत लोकेशन मागविले पण सुगावा अधांतरी होता.
दरम्यान , सुभाष जांगडे या अँटोचालकास मारेगाव पोलीस स्टेशन समोरील गतिरोधक नजीक सापडलेला मोबाईल स्वतःहून आज रविवारला सातपुते यांना संपर्क साधून परत केला अन सातपुते कुटुंबीयांचा जीव भांड्यात आला. मोबाईल ची तांत्रिक बाजू डिलीट करून आपणच वापरावा असा यत्किंचितही विचार त्याच्या मनात रुजला नाही.यामुळे त्याच्या प्रमाणिकपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे.दिवाळीच्या उंबरठ्यावर सापडलेला मोबाईल ही अँटोचालकाला सरप्राईज होते.मात्र नियतीत खोट नसल्याने सुभाष ने प्रामाणिकपणाचा आदर्श दाखवीत विरळपणा दाखविला.ही प्रचिती अनेकांना बोध घेण्यासाठी बाधक ठरो एवढीच अपेक्षा व्यक्त होत आहेत.