Type Here to Get Search Results !

धक्कादायक... मारेगाव तालुक्यात शुद्ध पाणी तपासणीला कोलदांडा

🔸प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

🔸नागरिकांवर ' पाणी रे पाणी तेरा रंग कैसा ' म्हणण्याची वेळ !


मारेगाव : दीपक डोहणे
सर्वत्र थंड व शुद्ध पाणी जारचा व्यवसाय सर्वत्र फोफावलेला दिसतो आहे.छोट्या मोठ्या कार्यक्रमात "फिल्टर" पाणी फॅशन ठरू पाहत आहे.नागरिकांना कँन चे शुद्ध पाणी मिळतेय का याबाबत नागरिकांसह प्रशासन अनभिज्ञ आहे.त्यामुळे हे पाणी तपासणीसाठी प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह उभे ठाकत आहे.

" पाणी रे पाणी तेरा रंग कैसा " म्हणण्याची किंबहुना आरोग्याचा प्रश्न नागरिकांच्या ऐरणीवर असतांना शुद्ध पाणी तपासणी , गुणवत्ता चाचणी करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची बहुदा झालीच नसल्याने हा प्रश्न अडगळीत आहे.मागील कित्येक वर्षांपासून प्रशासनाकरवी पाणी तपासणी शुद्ध च्या नावाखाली अशुद्धेत वाहत आहे.पर्यायाने तापसणीलाच कोलदांडा बसत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.विविध आजाराचे वेगवेगळे कारण अनेक आजाराला अशुद्ध पाण्याचे कारण ठरते आहे.

हल्ली बहुतांश ठिकाणी शुद्ध च्या नावाखाली कँन चे पाणी मागविण्यात येते.बियरबार ते पान टपरी पर्यंत शुद्ध व थंड पाण्याच्या कँन मागविण्यात येते.पाणी शुद्ध व अशुद्ध किती याची पुसटशी कल्पना नसलेले ग्राहक पाण्याच्या नावाखाली आपले आरोग्य दावणीला लावत आहे.

खरचं शुद्ध पाणी असते काय ? याची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा कोमात असतांना कुठल्याही ग्राहक अथवा व्यावसायिकांकडून तपासणी चा प्रयत्न होतांना दिसत नाही आणि ग्राहक मागणीही करीत नसल्याने व्यवसाय धारकांचे चांगलेच फावत आहे तर शुद्ध पाण्याचे गूढ मात्र गुलदस्त्यात पुढे सरकत आहे.शुद्ध पाण्याची गुणवत्ता कुणाच्याही प्लॅंटवर दिसत नाही. त्यामुळे अशुद्ध पाण्याने किडनीच्या दुर्धर आजाराचे कारण ठरू शकतो. अशुद्ध पाण्याने थॉयराइट्स , मुतखडा, कॉलरा, कावीळ, अतिसार बळावण्याचे हे भयाण वास्तव आहे.

नागरिकांच्या आरोग्या बाबत घेणेदेणे नसलेल्या प्रशासनाची डोळेझाक प्रवृत्ती दिसून येत आहे.एकूणच पाणी तपासणीला प्रशासनाकडून कोलदांडा मिळत असतांना गुणवत्ता नेमके कोण तपासणार या गंभीर प्रश्नांचे गूढ मात्र कायम आहे. त्यामुळे शुद्ध पाणी कोणते,कसे हा प्रश्न तहान भागविऱ्यांच्या मनात झिरपत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies