♦ झरी जामनी तालुक्यातील घटना
मारेगाव : दीपक डोहणे
लिंगटी रेल्वे स्थानका समोर एक वृद्ध महिला रेल्वे गाडीच्या धडकेने जागीच ठार झाल्याची घटना आज 4 ऑक्टोबर ला 11 वाजताच्या सुमारास घडली.
झरीजामणी तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर - मुंबई या रेल्वे मार्गावर पडणाऱ्या लिंगटी या रेल्वे स्थानका लगत असलेल्या 'नवीन धानोरा येथील रामक्काबाई देवगा पार्लेवार 80 'ही वृद्ध महिला शौचालयाकरिता रेल्वे स्थानकावरील रेल्वे क्रॉसिंग कडे येत असतांना, मार्गावर धावणाऱ्या ksnk या कोळसाच्या मालगाडीची जब्बर धडक बसल्याने ती रेल्वे रुळाच्या बाजूला फेकल्या गेली. त्यात तिच्या डोक्याला मार लागून जागीच ठार झाली. त्या महिलेला कमी ऐकाला येत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहेत. रेल्वे चालकाने अतिदक्षता दाखवून गाडी हळूहळू करून हॉर्न देत असतांना, वृद्ध महिलेकडून कुठलाच प्रतिसात मिळाला नाहीत.
रेल्वेच्या धडकेने वृद्ध महिला ठार झाल्याची माहिती मिळताच गांवातील काही युवक घटनास्थळी धाव घेतली.
शिवाय रेल्वे प्रशासन व स्थानिक पोलिसांना माहिती देऊन पाचारण्यात आले.