🔶प्रा.डॉ.अशोक राणा
🔶मारेगावात सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणे
मारेगाव , (०४ओक्ट.)मानवतावादी विचारसरणीसाठी आता बाबासाहेबांचे विचार अंगिकारने अनिवार्य आहे.ओबीसी मध्ये परिवर्तनवादी जनजागृती होत असल्याने मारेगाव सारख्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक ग्रंथालयाची निर्मिती केली.ही मोठी क्रांती आहे.या क्रांतीचे बीजे तालुक्यातच नव्हे तर सर्वदूर पेरा.जनतेत परिवर्तन करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे.हा आदर्श प्रामुख्याने आजच्या पिढीने घेतला पाहिजे.डॉ. आंबेडकरांचे प्रेरक विचारच आमूलाग्र बदल करून माणूस घडवितो म्हणूनच परिवर्तन वादाचे विचार वाचनालयातून पेरण्याची नितांत गरज प्रसिध्द साहित्यिक प्रा.डॉ. अशोक राणा यांनी प्रतिपादित केली.
ते मारेगाव येथे रविवारी ओबीसी कृती समितीचे वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वणी येथील सावित्रीबाई फुले वाचनालयाचे अध्यक्ष मा.बाळासाहेब राजूरकर होते.अनंता मांडवकर , प्रदीप बोनगीरवार,मोहन हरडे,पंडिले सर,राजेश पोटे,बिहाडे सर,रामटेके सर,इंदूताई किन्हेकर, शकुंतला वैद्य यांची यावेळी मंचावर उपस्थिती होती.
प्रा.डॉ.राणा पुढे म्हणाले,वाचनालयाचे प्रमाण कमी होतेय असे मला वाटत नाही.वाचक मोठ्या प्रमाणात आहे.पुस्तके वाचून माणूस बदलतोय हे खरं असलं तरी तारतम्य बाळगून अवघ्या वयापासून वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे.ग्रंथालयासाठी घर बांधणे जगाच्या पाठीवर एकमेव व्यक्तिमत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.मारेगावात ओबीसी घटकांनी स्तुत्य उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरू करून ज्ञान वाटण्याचे मुक्तद्वार अनेकांना पचले नसेल मात्र राष्ट्रसंतांनी आपल्या प्रगल्भ विचारातून कुणाच्या मागे न धावता या वाचनालयाचा आदर्श आजच्या पिढीने घेतला पाहिजे ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब राजूरकर यांनी आपल्या मौलिक विचारातून आज प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. वर्णव्यस्थेचा काळ हळूहळू पुढे सरकत असतांना मानवाला जगण्यासाठी पुस्तके वाचून ज्ञान अंगिकारने गरजेचे आहे.विचार मांडणारे पुस्तके असावी तरच परिवर्तन शक्य आहे हे आता गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
हे वाचनालय अभिमानाची बाब आहे.येथूनच तिहेरी पिढी तयार करणे आवश्यक आहे.या बाबीचे देणं आपणास दयावे लागणार आहे. दातृत्व क्षमता देण्याची सर्वांची गरज आहे. ती सर्वांनी अमलात आणावी असा आशावाद सन्माननीय राजूरकर यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबाराव ढवस यांनी केले.सूत्रसंचालन लिलाधर चौधरी तर कळंबे सर यांनी आभार मानले.कार्यक्रमासाठी वाचनालयाचे पदाधिकारी , ओबीसी कृती समितीने पुढाकार घेतला.