🔹️प्रतिकुल परिस्थिती, अपंग शेतकऱ्याच्या मुलीने केले सर पार..!
🔹️पंचक्रोशीत कुतूहल अन अभिनंदनाचा वर्षाव
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणे
मारेगांव, (०8.ऑक्टो ) तालुक्यातील बोटोणी येथील शेतकरी विशाल पिंपरे यांच्या चार वर्षीय मनस्वी चिमुकलीने कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे झालेल्या सलग ८१ तासाच्या स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सहभाग घेत ९ बुक्स ऑफ रेकॉर्ड करीत विजयी विश्वविक्रम केलाय.मारेगाव तालुक्यासाठी भूषणावह ठरलेल्या शेतकऱ्याच्या मुलीने यशाचे सर पार केल्याने पंचक्रोशीत मनस्वी बाबत कुतुहल अन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्नाटक येथे झालेल्या स्केटिंग वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये २१० मुलांनी सहभाग घेतला होता.यात मनस्वी ही सर्वात लहान होती.अवघे ३ वर्षं ९ महिन्याची असलेली मनस्वी हिला लहानपणापासून खेळाची विशेष आवड आहे.रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी पुणे येथे अवघ्या तीन महिन्यात स्केटिंग चे प्रशिक्षण घेतले.प्रशिक्षक विजय मलजी यांच्या विशेष पुढाकाराने तिने यात सहभाग घेतला..
बुक्स ऑफ रेकॉर्ड, इंडियन यंग अचिवर्स बुक्स ऑफ रेकॉर्ड ,बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड,ग्लोबल रेकॉर्ड,आशिया फॅसिफिक रेकॉर्ड्स, नॅशनल रेकॉर्डस्, आशिया बुक्स ऑफ रेकॉर्डस्,बेस्ट ऑफ आशिया रेकॉर्डस्,एक्सष्ट्रेम रेकॉर्डस्,अशा रेकॉर्डस् मध्ये मनस्वी ची अवघ्या वयात नोंद आहे.प्रतिकूल परिस्थितीत , पायाने अपंग असलेल्या विशाल पिंपरे यांच्या इवल्याश्या कन्येची गगनभरारी मारेगाव तालुक्यासाठी भूषणावह ठरत आहे.मनस्वी आपल्या यशाने सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.
अवघ्या चार वर्षांनी मनस्वी विशाल पिंपरे ही तूर्तास कोंढवा बुद्रुक येथे राहते. मारेगाव तालुक्यातील बोटोणी हे त्यांचे मूळ गाव.पायाने अपंग असलेल्या तिच्या वडिलांचा लघु व्यवसाय आहे.मनस्वी हिने ८१ तासात दहा तास स्केटिंग केले. यात २२० मुलामुलींनी सहभाग घेत १०००६ लॅप्स (२००६) किमी.चे अंतर होते.यात मनस्वी ही सर्वात लहान होती. हे विशेष