Type Here to Get Search Results !

मारेगावात बालीकेचा विनयभंग

🔹️पांढरकवडा ( पिसगाव) येथील संशायितावर पोस्को अंतर्गत गुन्हा 
🔹️भल्या पहाटे बिअरबार मधुन शिताफीने अटक
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणे
मारेगांव, (०8.ऑक्टो ) ,येथील कान्हाळगाव रोडवर वास्तव्यात असलेल्या एका कुटुंबातील सोळा वर्षीय बालिकेचा वेटरने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री उघटकीस आल्याने संशायित आरोपीस भल्या पहाटे पोलिसांनी  ताब्यात घेऊन गजाआड केले.
     येथील कान्हाळगाव रोडवर एक कुटुंब वास्तव्यात आहे.मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा (लहान) येथील संशायित आरोपी हा एका बिअरबार मध्ये वेटरचे काम करतोय. रात्री सर्व झोपेत असतांना पिडीत अल्पवयीन मुलीच्या घरात संशायिताने  प्रवेश करून सोळा वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याने ती ओरडली.बेताल बनलेल्या संशायिताने गप्प राहण्यासाठी पाचशे रुपये दाखविले. तोपर्यंत सर्वच कुटुंब जागे झाले.कुटुंबीयांनी त्याला पकडण्याच्या प्रयत्नात धक्काबुक्की करीत पोबारा केला.
       दरम्यान , कुटुंबातील व शेजाऱ्यांनी पाठलाग केला मात्र सळो की पळो म्हणून संशायित आरोपीने पळ काढला.पीडित मुलीच्या कुटुंबांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे मार्गदर्शनात संशायितास शोधण्यासाठी बिट जमादार आनंद अलचेवार , विनेश राठोड ,अजय वाबिटकर यांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवीत आरोपी महादेव बन्सी पाटील (३३) याला मारेगाव -वणी राज्य महामार्गावर असलेल्या एका बिअरबार मध्ये दडून बसलेल्या ठिकाणावरून पहाटे चार वाजता शिताफीने ताब्यात घेत गजाआड केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies