🔹️तोडक्या पैशाची आणेवारी रद्द करण्यात यावी
🔹️स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे सरकार कडे साकडे
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणेमारेगांव, (०८.ऑक्टो ) या वर्षाला सततच्या पावसाने उत्पादनात कमालीची घट निर्माण होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवस्थापन व वेळापत्रक पुरते कोलमडले आहे.अशातच प्रशासना करवी तालुक्याची आणेवारी डोळेझाक प्रवृत्तीने तोडक्या पैशात काढली त्यामुळे अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या मागावर असतांना मायबाप सरकारने मारेगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व तोडक्या पैशाची आणेवारी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत विनाविलंब जाहीर करावी अशा मागणीचे साकडे मारेगाव तालुका स्वराज्य शेतकरी युवा संघटनाचे वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनातून घातले आहे.
शेती हा मुख्य व्यवसाय असलेल्या मारेगाव तालुक्यात कपाशी , तूर व सोयाबीन पिकांचे स्तोत्र आहे.मात्र यंदाच्या सततच्या पावसाने या पिकांवर अत्यल्प उत्पादनाची करडी नजर लागली आहे. त्यामुळे येथील शेतकरी पुरता हवालदिल आहे.उभ्या पिकातील कपाशी- सोयाबीन भुईसपाटच्या मार्गावर आहे.त्यामुळे आर्थिक विवंचना शेतकऱ्यांच्या नशिबी चिकटलेला असतांना प्रशासना करावी जखमेवर मीठ चोळीत तोडकी आणेवारी घोषित केली.त्यामुळे शेतकरी वर्गात कमालीचा असंतोष खदखदत आहे.
परिणामी ही आणेवारी रद्द करून तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आर्थिक विवंचनेत गुरफटलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी अशा आशयाची मागणी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे गजानन किन्हेकर , सचिन पचारे , विशाल किन्हेकर ,सोमेश्वर गेंडेकर , विशाल राऊत , विजय मेश्राम हे उपस्थित होते.