Type Here to Get Search Results !

कृषि विद्यार्थ्यांने केले ई पीक‌‌ पाहणी ऍप चे मार्गदर्शन

विदर्भ सर्च न्यूज | सुदर्शन टेकाम

मारेगाव , (०३ ओक्ट.)
 पीक‌‌ नोंदणी साठी कृषि विभाग, महसूल विभागाने स्वतंत्रपणे मोबाईलऍपची निर्मीती केली आहे ही पध्दत शेतकऱ्यांना नवीन असलेल्या ने शेतकऱ्यांना समस्या व अडचणी चा सामना करावा लागतो?
डाॅ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला स्वलगणीत, कृषि महाविद्यालय कोंघारा येथील कृषी दुत चतुर्थ वर्षा चा विद्यार्थी कु पियुष संजय पारखी या विद्यार्थ्यांनी कृषी मंत्रालय व महाराष्ट्र शासन यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन 7/12 ई पीक पाहणी कशी करावी 
      या बाबत श्री रमेश बेहरे यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन केले ई पीक‌‌ पेरवे भरते वेळी 7/12 बाळगावे तसेच चालू मोबाईल नंबर ठेवणें शेतीवर जाउन‌ नोंदणी करणे कमी नेटवर्क असेल तेथे नोंदणी करु नये ,पीकाचा फोटो घेताना लोकेशन चालू असणे आवश्यक आहे, इत्यादी गोष्टी बाबतीत मार्गदर्शन करुण ई पीक प्रात्यक्षिके करून दाखवली
  या कार्यक्रमात प्राचार्य महेश राठोड कार्यक्रम अधिकारी प्रा विशाल भाकडे,विषयशिक्षक प्रा,दत्ता जाधव,प्रा, हेमंत वानखेडे,प्रा,अजय सोळंकी,प्रा, स्नेहल आत्राम,प्रा, पल्लवी येरगूडे,प्रा,काजल माने यांचें मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies