🔹️चिंचमंडल येथील घटना
🔹️शेतकऱ्याचे ७५ हजार रु.नुकसान
मार्डी : प्रवीण वाळके
तालुक्यातील चिंचमंडळ येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पशुधनास सर्पदंश झाल्याने किमान ७५ रुपयाचे नुकसान झाले आहे.सततच्या पावसाने सोयाबीन व कपाशी पिके उद्ध्वस्त होऊन मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांपुढे या नुकसानीने संकट गडद झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी अशी आर्जव मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे.
चिंचमंडळ येथील विनायक पुरोषत्तम भोयर असे नुकसान झालेल्या वडिलोपार्जित अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून रविवारी सायंकाळी पाच वाजताचे सुमारास स्वतःची बैलजोडी शेतात चारत असतांना एक पशुधनास पायाला सर्पदंश झाला.लगेच शेतकऱ्याने पशुधन घरी आणून पशुधन चिकित्सालय मार्डी येथे संपर्क साधला मात्र प्रशासन कर्मचाऱ्यां कडून प्रतिसाद मिळाला नसल्याने व विहित वेळेत उपचार मिळाला नसल्याने पशुधनाचा प्रशासनाच्या तकलादू धोरणाने मध्यरात्री मृत्यू होऊन किमान ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केला आहे.
दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी पिडीत शेतकऱ्याने केली आहे.अलीकडेच निसर्गाच्या बेतालाने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट उभे ठाकले आहे.