मारेगाव शहरातून निघाली विधी प्रबोधन रँली
मारेगाव : दीपक डोहणे
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाकडुन राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत कायदेविषयक व्यापक जनजाग्रुती मोहिमेचे आज थाटात उद्घाटन संपन्न झाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनानुसार स्वातंत्राच्या अमृत मोहोत्वसाचे औचित्य साधुन गांधी जयंती ते नेहरू जयंती पर्यंत सलग 44 दिवस मारेगाव तालुक्यात विविध जनजागृति कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रम अंतर्गत आज 2 ऑक्टोम्बर ला गांधी जयंतीच्या दिनी मारेगाव न्यायालयात थाटात उद्घाटन सोहळा पार पडला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यमान न्यायाधीश नीलेश वासाडे होते.प्रमुख अतिथि म्हणून सौ शामली निलेश वासाडे, नायब तहसीलदार श्री. कापसे,कृषि विस्तार अधिकारी सुनील वाघमारे,ज्येष्ठ विधिज्ञ पी .एम. पठाण , वरीष्ठ नागरिक पुंडलिक साठे, सहायक फौजदार मनोज बोढलकर ,ऍड हुमेरा शरीफ ,गोविंद ठावरी सर मंचावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व विधी सेवा समितीचे महत्व विशद केले. यानंतर शहरातून कायदेविषयक जनजागृती करणारी रॅली काढून कायद्याचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे संचालन ऍड. करिष्मा किन्हेकार हीने तर आभार प्रदर्शन विधी स्वयंसेवक प्रगती मुरस्कर हीने व्यक्त केले.
यशस्वीतेसाठी ऍड. मेहमूद पठाण, ऍड. आशीष पाटिल, ऍड.नलिनी कोडापे, काजल शेख, मेघा कोडापे, भाग्यश्री बदखल विधी स्वयंसेवक अशोक कोरडे, सुमित हेपट, नागेश रायपुरे, वैभव कायरकर, प्रगती मुरस्कर, वैष्णवी, कायरकर, प्रतिक वैद्य, गणेश ढुमणे, गौरव मोरे, गौरव बेसकर, यांचेसह न्यायालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.