स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कुचारा कुंडीचे वाटप करण्याचा विधायक उपक्रम
बोटोणी :- जयप्रकाश वनकर
आज दिनांक ०२ ऑक्टोबर ला ग्रामपंचायत चिं बोटोनी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
जयंती कार्यक्रमाला गावातील नागरीका समवेत सरपंचा सुनिता विनायक जुमनाके उपसरपंच प्रवीण शंकर वनकर सदस्य किसन वडस्कर,केशव टेकाम,सुवर्णा ठक,अश्विनी मडावी आदि सदस्य गण उपस्थित होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे दुसरे प्रधान मंत्री यांच्या कार्याची महंती उपसरपंच प्रवीण वनकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून सांगितली. जयंती कर्यक्रमाला प्रामुख्याने राजेश पांडे, विनायक जुमनाके, नानाजी लालसरे, विनोद मिन्देवार आदीची उपस्थिती होती. जयंती निम्मित स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावात कचरा कुंडीचे वाटपाचा विधायक उपक्रम राबविण्यात आला.