🔹️सनासुदीच्या काळात सतर्कतेचा इशारा
🔹️अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल
विदर्भ सर्च न्यूज | दिपक डोहणे
मारेगाव,(5 ऑक्टो.)शहरातील आजच्या आठवडी बाजारातून एका महिलेचा गळ्यातील पोत ( सोनसाखळी ) लांबविल्याची घटना सायंकाळी सहा वाजताचे सुमारास घडल्याने महिला वर्गात भीतीचे सावट निर्माण झाले आहे.पिडीत महिलेने पोलिसात तक्रार दाखल केल्याने अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साधना नंदकिशोर देऊळकर रा. मारेगाव असे गळ्यातील सोनसाखळी लंपास झालेल्या पीडित महीलेचे नाव असून ती आज मंगळवारी मारेगाव येथे आठवडी बाजारात भाजी खरेदी करीत असतांना गळ्यातील सोनसाखळी लंपास करण्यात आली.साडेबारा ग्रॅम असलेल्या या सोन्याच्या दागिन्यांची किंमत किमान ४० हजार रुपये असून पिडीत महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान सणासुदीच्या काळ सुरू असतांना आठवडी बाजारात बाहेरगावची चोरटी टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारांना गजाआड करण्याचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे.परिणामी गर्दी ठिकाणी महिलांनी दागिन्यांचा वापर न करण्याचा इशारा या घटनेवरून देण्यात आल्याने महिलांनी सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.