Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्याचे पशुधन कार्यालय अधिकाऱ्याविना वांझोटे

🔹️उपचार व शवविच्छेदनाकरिताही डॉक्टर नाही
🔹️जिल्हा प्रशासनाने एकमेव डॉक्टरला केले रिलिव्ह
🔹️लोकप्रतिनिधीचे उदासीन धोरण कारणीभूत

विदर्भ सर्च न्यूज दीपक डोहणे
मारेगाव ,(०५ ऑक्टो. ) शेकडो गावांचा परिघ असलेल्या मारेगाव तालुक्यात पशुधनाच्या आजारपणाच्या प्रश्न अतिशय संवेदनशील झाला आहे.येथील कार्यालयात एकही पशुसंवर्धन अधिकारी नसून येथे आजतागायत असलेल्या अधिकाऱ्यास जिल्हा प्रशासनाने रिलिव्ह करण्यात धन्यता मानली.त्यामुळे हा विभाग अधिकारी व तोडक्या कर्मचारीमुळे वांझोटा ठरत आहे.लोकप्रतिनिधीनाही या गंभीर बाबीकडे लक्ष केंद्रित करण्यास वेळ नसल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळत आहे.
     मारेगाव तालुक्याला  शहरासह शेकडो गावे संलग्नित आहे.येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.मात्र पशुधनास आजारपणात उपचार करण्यासाठी डॉक्टरच नसल्याने व एखाद्या पशुधनाचा मृत्यु झाल्यास शवविच्छेदन करण्यासाठी पशुधन अधिकारीच नसल्याचे मारेगाव तालुक्याचे भयाण वास्तव आहे.
     तूर्तास मारेगाव तालुक्यात केवळ दोन पशुधन पर्यवेक्षक म्हणून डॉ. मुनिंद्र मुन व राजगडकर तर कुंभा येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून तलमले कार्यरत आहे.पाच दिवसांपूर्वी पर्यंत पशुधन विकास अधिकारी डॉ. विश्वनाथ जगाडे यांचेकडे बोटोणी सह मार्डीचा भार, मारेगाव विभाग व फिरता पशु वैद्यकीय दवाखाना असा जम्बो प्रभार होता.कामाच्या व्यापाने पुरते त्रागलेले डॉ.जगाडे यांचे सोलापूर येथे मागील १   तारखेला स्थानांतरण झाले.यत्किंचितही वेळ न दवडता जिल्हा प्रशासनाने त्यांना रिलिव्ह केले आणि मारेगाव सारख्या आदिवासी बहुल तालुक्यात अधिकाऱ्यांचा भोपळा तयार करण्याची तसदी घेतली.मात्र तालुक्यात पशुधनावर वेगवेगळ्या आजाराची करडी नजर लागली असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांत कमालीचा संताप व्यक्त केला जातो आहे. किंबहुना लोकप्रतींनिधीनाही सोयरसुतक नसल्याने मूग गिळून आहे. लोकप्रनिधींच्या बेतालपणाचा परिपाक म्हणून हा पशुधन विभाग वांझोटा ठरत आहे.दरम्यान, मारेगाव तालुक्यात चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी पशुधनावर उपचार करून धूम ठोकत असल्याचे वास्तव आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies