प्रशासन मात्र साखरझोपेतच
लोकप्रतिनिधीप्रती होतोय संताप व्यक्त
मारेगाव : संतोष बहादूरे
तालुक्यातील कोलगाव वेगाव कालव्या लगत असलेल्या रस्त्यावर मोठमोठ्या जीवघेण्या खड्ड्याने अपघाताची शक्यता बळावली होती.शेतकऱ्यांच्या संवेदनशील प्रश्नाला " विदर्भ सर्च न्यूज " वृत्त प्रकाशित केले.संभाव्य धोका होण्यापूर्वीच परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून हे खड्डे बुजविण्याचे विधायक काम करून बोथट बनलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला चपराक हाणली.लोकप्रतिनिधीचे उदासीन धोरण ही कारणीभूत ठरले.
वेगाव कोलगाव रस्त्याच्या पूर्वेला कँनल रस्ता आहे.शेतशिवार असलेल्या परिसरातील या रस्त्याने मोठ्या प्रमाणात दळणवळण असते.यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्याने मोठे खड्डे पडून पायदळ चालणे अवघड झाले होते.याची दखल घेऊन विदर्भ सर्च न्यूज ने वृत्त प्रकाशित केले मात्र प्रशासन पुर्णतः कुंभकर्णी झोपेत असल्याने या गंभीर बाबीकडे सपशेल दुर्लक्ष केले.किंबहुना येथील लोकप्रतिनिधींचे उदासीन धोरण कारणीभूत ठरले.अखेर भविष्यात संभाव्य धोका पत्करण्याची वेळ येऊ नये म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून जेसीबी मशीन च्या सहाय्याने हे जीवघेणे खड्डे भरले.समांतर झालेल्या रस्त्याने तूर्तास धोका संपला असला तरी बोथट बनलेल्या व्यवस्थेला शेतकऱ्यांनी चांगलीच चपराक हानल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केली जाते आहे. शेतकऱ्यांच्या या स्वखर्चित विधायक कामाने लोकप्रतींनिधींना आता तरी जाग येईल का हा खरा प्रश्न शेतकऱ्यांसाठी अनुत्तरीत आहे.