झरी जामनी : प्रतिनिधी
मुकुटबन येथून पाच कि.मी. अंतरावरील भेंडाळा येथील विवाहित युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज १५ ऑक्टोबर शुक्रवार ला सकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडीस आल्याने ऐन सणाच्या दिवसाला या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत भेंडाळा, येथील 'गणेश रामदास खरवडे' (३५) या विवाहीत युवकाने आपल्या राहत्या घरी रात्री दरम्यान भांड्याच्या रॅक ला दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही बाब सकाळी कुटूंबियांना माहीत पडताच एकच हंबरडा फोडला.या घटनेची गावात वार्ता पसरताच एकच खळबळ उडाली. गणेशच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेची माहिती मृतकाची आई ने मुकुटबन पोलिसात दिली आहेत. मृतकाच्या मागे आई ,आजोबा आणि पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहेत.
