♦पोलिस निरिक्षक राजेश पुरी यांची प्रमुख उपस्थिती
♦शेकडो अनुयायीनी वाहिले बुद्ध रूपास पुष्प व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
मारेगाव : दीपक डोहणे
धम्मचक्र प्रवर्तन दिना निमीत्त मारेगाव येथे शेकडो अनुयायींनी स्थानिक धम्मराजिका बुद्ध विहारात बुद्ध रुपास पुष्प अर्पण करित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
सन १४ आँक्टोंबर १९५६ ला भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायींना बौद्ध धम्माची नागपुर येथे दिक्षा देवून जगाच्या इतिहासात ऐतिहासिक नोंद केली.तेव्हा पासुन या दिनी धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केल्या जाते.
याच दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथे पोलिस निरिक्षक राजेश पुरी यांनी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पन करुन अभिवादन केले.यावेळी शेकडो अनुयायीनी अभिवादन केले.
धम्मराजिका बुद्ध विहार येथे कमिटीचे उपाध्यक्ष रामदासजी नगराळे यांनी पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करुन विहारात सामुहीक बुद्ध वंदना घेण्यात येवुन बुद्ध रुपास पुष्प अर्पण केले.यावेळी कमिटीचे अध्यक्ष उदय रायपुरे , सचिव दीपक डोहणे, संघटक अनिल खैरे , माणिकराव दारुंडे, अमर पुनवटकर,बंटी बाभळे,दिलीप शंभरकर, महादेव डोहणे, यांचेसह बहुसंख्य अनुयायिंची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोषाध्यक्ष गौरव चिकाटे यांनी केले.

