🔸फिर्यादीला जातीयवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
मारेगाव : दीपक डोहणे
तालुक्यातील बोटोणी येथील राज्यमहामार्गालगत असलेल्या धाब्याचे संचालक यांनी शेतमालकास जातीयवादक शिवीगाळ केल्याप्रकरणी आज गुरूवारला गुन्हा दाखल करण्यात आला.बाळासाहेब हरीभाऊ पाटील (४०)असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशायितांचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनुसार, बोटोणी येथे मागील एप्रिल महिन्यात फिर्यादी पुंडलिक मेश्राम यांच्या बोटोणी शिवारातील पडीक शेतातून काही जण मुरूम चोरून नेत असल्याची माहिती मिळाली.यासंदर्भातील तक्रार मारेगाव पोलीस व तहसील प्रशासनास देण्यात आली.प्रशासनाकरवी सदरील घटनेचा मोका पंचनामा २० / १० /२०२० बुधवारला करण्यात आला.येथून कर्मचारी रवाना झाल्यागत संशायित व फिर्यादी यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली.यात संशायितांने जातीयवादक शिवीगाळ केल्याचा आरोप करीत मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली.त्यानुसार संशायित आरोपी बाळासाहेब हरिभाऊ पाटील रा.बोटोणी यांचेवर कलम ३(१)(आर),३(१) एस, नुसार अँट्रासिटी चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.