मारेगाव : कैलास ठेंगणे
डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालयात कोंघारा येथील कृषिदूत चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी कु. वैभव पांडुरंग मेडीलवार या विद्यार्थ्यांनेफवारणी करताना घ्यावयाची काळजी तसेच शास्त्रशुद्ध फवारणी कशा प्रकारे करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत प्रात्यक्षिक कार्यक्रमात फवारणी करतांना शेतकऱ्यांनी स्वच्छ पाण्याचा वापर करावा. गडूळ पाण्याचा वापर केल्यास औषधीवर विपरीत परिणाम होऊन त्यांची कार्यक्षमता कमी होते.तसेच शेतकऱ्यांनी मास्क,चष्मा, रबरी हातमोजे लाहूनच फवारणी करावी.व फवारणी करतावेळेस तंबाकू, गुटखा, व धूम्रपान करू नये. असे मार्गदर्शन केले.व या सर्व पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या वेळी मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) या गावामध्ये झालेल्या या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी शेतकरी खुशाल कुडमेथे, सुधाकर नैताम,चंद्रकांत मेडीलवार, देवराव कोरवते, रंजीत सोयाम, पांडुरंग मेडीलवार, राजू राठोड, नागेश कुडमथे, राम, तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य महेश राठोड, कार्यक्रम अधिकारी प्रा. विशाल भाकडे, प्रा. हेमंत वानखेडे, प्रा. अजय सोळंकी, प्रा. शुभम शिरपुरकर प्रा. पल्लवी येरगुडे, प्रा.स्नेहल आत्राम, प्रा. काजल माने, प्रा. गायत्री इंजाळकर,या सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.