वणी प्रतिनिधी
दिनांक 20 ऑक्टोंबर ला वणी येथील विराणी फंक्शन हॉल परिसरात गुन्हे शाखेने धाड टाकून एकता नगर येथील मटका अड्डा चालवणाऱ्याला अटक केली आहे. या धाड सत्रामध्ये मुख्य कार्यवाही यवतमाळ येथील गुन्हे शाखेने केली. वणी येथे मोठ्या प्रमाणात मटका पट्टी चालत आहे अशी त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. दिनांक 20 ऑक्टोंबर ला गुन्हे शाखेचे पथक दुपारला दोन वाजताच्या सुमारास वणी येथे आले त्याच गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी काल दिनांक 20 ऑक्टोंबर ला दुपारी दोन वाजता एकता नगर परिसरात साध्या ड्रेस मध्ये शहानिशा केली. व त्यानंतर संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास सापळा रचून दोन घरी छापे मारले यामध्ये पहिल्या घरून २६ युवकांना तसेच दुसऱ्या घरून ९ युवकांना अटक करण्यात आली या छापेमारी मध्ये एकूण 89 मोबाईल संच, लॅपटॉप, प्रिंटर असे एकूण नऊ लाख ते दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४,५ तसेच 109,188,269,270 भादवी नुसार गुन्हे दाखल करण्यातआले आहे . सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली होती.
वणी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह
वणी पोलीस स्टेशन हद्दीत अनेक अवैध धंदे चालू आहे. या अवैध धंद्यावर वणी पोलीस काय पाऊल उचलतील व अवैध धंदे वणीतून हद्दपार करतील काय याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे व दिनांक 20 ऑक्टोंबर ला झालेली कारवाई वणी शहरातील इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे असी खमंग चर्चा वणी मध्ये आहे