♦ सोशल मिडिआ वर मागील काही दिवसापासून वायरल होत असेलेया ३अल्पवयीन मुलींची सुटका आरोपी जेरबंद
सविस्तर वृत्त असे की, दि.२७/०९/२०२१ रोजी वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अल्पवयीन मुली त्यांचा मैत्रीणचा वाढदिवस असल्याचे सांगून मुली घरून निघुन गेल्या होत्या. मात्र मुली सायंकाळ पर्यंत घरी परत न आल्याने आई वडीलांनी सर्वत्र शोध घेतला ईतर नातेवाईकांनी मुलींचा शोध घेतला परंतु कोणत्याही मैत्रिणी,नातेवाईकांनी त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती नसल्याने अखेर मुलींच्या नातेवाईकांनी पो.स्टे. वरोरा येथे दिनांक 28 सप्टेंबर रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोदविली.
पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध मुलींना फुस लावून पळवून नेल्या बाबत गुन्हा दाखल करून तपासकार्य सुरू केले. दोन्ही मुलींचे वय १५ वर्षांहून कमी आहे त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ सदर गुन्हयाचा शोध लावण्या करीता सुचना दिल्या.
पोलीस निरीक्षक खाडे ह्यांनी तात्काळ स.पो.नि जितेंद्र बोबडे, पो.उपनि. संदीप कापडे, सचिन गदादे, अतूल कावळे यांचे नेतृत्वात चार पथक तयार करून शोध मोहिम सुरू केली. पथकाने तपास चक्र जलद गतीने फिरवत गुन्हयातील तिन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली व त्यांचे सोबत ४ संशयीत मुले सापडून आल्याने सर्वांना ताब्यात घेवून चंद्रपूर येथे आणण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.