🔹️ प्रतिस्पर्ध्याचा मृत्यू अन संशायित दोन भावंडांना अटक
🔹️मारेगावातील घटना
मारेगाव ; दीपक डोहणे
शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील प्रतिस्पर्ध्याच्या घर शेजारी असलेल्या युवकात कडाक्याचा वाद होऊन वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.हा वाद दि.११ ला रात्री अकरा वाजताचे दरम्यान घडला.यात प्रतिस्पर्धी युवक गंभीररीत्या जखमी झाला.त्यास यवतमाळ येथे दाखल करण्यात आले मात्र त्याचा बुधवारला दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.हाणामारीचा प्रसंग जिवावर बेतल्याने दोन प्रतिस्पर्धी भावंडावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार , मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ८ येथील वाढई व लालसरे हे कुटुंब घराशेजारी राहतात.दि.११ सोमवार रोजी लालसरे व वाढई यांच्यात कडाक्याचे भांडण झाले.दोघांनीही एकमेकास मारहाण केली.यात संजय लक्ष्मण वाढई( ३४) यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला मारेगाव ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीस प्रतिसाद देत नसल्याने त्याला वणी येथे हलविण्यात आले. येथून यवतमाळ येथे दाखल करण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा बुधवारला दुपारी मृत्यू झाला.
दरम्यान मृतकाच्या वडिलांनी मारेगाव पोलिसात फिर्याद नोंदवून संशायित आरोपी हर्षल धनराज लालसरे (२३)व निखिल धनराज लालसरे (१७) या दोन भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.