Type Here to Get Search Results !

मारेगाव मिनी बसस्थानक प्रस्ताव अंतिम टप्प्यात

🔹️रमण डोये यांच्या अथक प्रयत्नाची फलश्रुती
🔹️ मुंबईत हालचालीला वेग
विदर्भ सर्च न्यूज़ | दीपक डोहणे
मारेगाव (13.ऑक्टों) गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांच्या गैरसोयीचे माहेरघर ठरत असलेल्या बसस्थानकाचा प्रश्न अंतिम टप्प्याकडे वळला आहे.यवतमाळ जिल्हा कांग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमण डोये यांनी सर्वस्वी कागदपत्रांचा  संबंधित अधिकारी व विभाग यांचे कडे  पाठपुरवठा केल्याने लवकरच मूर्तरूप मिळणार आहे.मुंबईत झालेल्या बैठकीत हे मिनी बसस्थानकाचे पाऊल पुढे सरकले आहे.
मागील पाच वर्षांपूर्वी पासून मारेगाव येथील बसस्थानका करिता अनेक राजकीय व सामाजिक संघटनेने आंदोलन केले.मात्र हे आंदोलन केवळ मारेगाव पुरता मर्यादित ठरले. दरम्यान काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रमण डोये यांनी या लालफितीत अडकलेल्या प्रश्नाला स्थानिक , जिल्हा ते महामंडळ विभाग आणि मंत्रालयात कागदोपत्री दिशा देऊन आकार दिला आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांची थेट भेट घेत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक पावले उचलीत संबंधित विभागांना सूतोवाच करीत खनिज विकास विभागाला निधी ची मागणी केली.तात्काळ वाहतूक विभागाला पत्र सादर करून इष्टीमेट मागविले.त्यानुसार मुंबई येथील थेट भेटीत बाजार समितीचे सभापती नरेंद्र ठाकरे , जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमन डोये , माजी पंचायत समिती संचालक नानाजी डाखरे , सरपंच तुळशीराम कुमरे या शिष्टमंडळाने महाराष्ट्र महामंडळाचे अभियंता प्रमुख मुंबई यांचेशी सकारात्मक चर्चा किमान २५ लाख रुपयांचा निधी , बसस्थानक लगत प्रसाधन गृह व कायमस्वरूपी कर्मचारी ठेवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे.या यथोचित यशाने येथील प्रवाशांची भर रस्त्यावर उभे राहण्याची गैरसोय लवकरच टळणार असल्याचा निर्वाळा मिळाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies