🔸अँटो पलटी , तिघे जखमी
🔸 गोदाम पोड नजीक पहाटेची घटना
बोटोणी प्रतिनिधी : सुनील उताने
केळापूर देव दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या धावत्या अँटोत रस्ता ओलांडणारा घोडा घुसून अँटो पलटी झाल्याने तीन भाविक जखमी तर घोड्याच्या पोटात काच घुसल्याने घोडाही जखमी झाल्याची विचित्र घटना गुरुवारी पहाटे राज्यमहामार्गावरील गोदामपोड नजीक घडली.
प्राप्त माहितीनुसार , नवरात्र उत्सवात केळापूर येथील जगदंबा मातेचे दर्शन घेण्यास बोटोणी परिसरातील भाविक बुधवारला संध्याकाळी गेले. पहाटे परतीच्या प्रवासात काही भाविकांना नानाजी नगर येथे सोडून काहींना सोडण्यास सोनूपोड येथे अँटोने जात असतांना दोन मोकाट घोडयापैकी एक घोडा सैरभर धावत धावत्या अँटोत अचानक घुसला.बसलेल्या भाविकांची पुरती तारांबळ उडून चालकाचे नियंत्रण सुटले आणि अँटो अलगद पलटी झाला.अँटोत बसलेले तीन भाविक पैकी करण गणपत रामगडे (२२) रा.सोनूपोड यास जबर मार लागून मारेगाव येथील ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले. अँटो चालक समीर टेकाम (२२) रा.जानकाईपोड हा किरकोळ जखमी झाला.तिसऱ्या जखमी भाविकांचे नाव प्राप्त होवु शकले नाही.दरम्यान घोडा अँटोत घुसल्याच्या विचित्र घटनेने घोड्यास अँटोचे काच शरीरात घुसल्याने जखमी झाला आहे.
मागील अनेक दिवसांपासून बोटोणी परिसरात दोन घोडे सैरभर वावर करीत हे मोकाट घोडे नागरिकांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग ओढावत असल्याने प्रशासनाने त्यांना ' लगाम ' लावण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

