🔹️उद्या होणार पांढरकवडा येथे रुजू
🔹️मारेगावचे नवे ठाणेदार राजेश पुरी
विदर्भ सर्च न्यूज | दीपक डोहणे
मारेगाव(१२ऑक्टो ) एकशे पाच गावांची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात सक्षम ठरलेले मारेगाव येथील पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांचे पांढरकवडा येथे स्थानांतरण झाले आहे. उद्या ते पांढरकवडा येथे रुजू होणार आहे.
श्री.जगदीश मंडलवार यांचा प्रशासकीय कालावधी संपुष्टात आल्याने स्थानांतरण झाले आहे.त्यांच्या कार्यकाळात अवैद्य व्यवसाय करणाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळण्यात आल्या होत्या.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवतांना सामाजिक दायित्वाची भावना ही त्यांनी रुजविली होती.कायद्याचे काटेकोर पालन करून प्रत्येक गावात शांतता नांदण्यासाठी त्यांचे अथक परिश्रम ही ओळख त्यांनी मारेगाव तालुक्यात कोरली .
प्रशासकीय कालावधी संपुष्टात आल्यागत त्यांचे आज पांढरकवडा येथे स्थानांतरण झाले. मारेगाव येथे नवे पोलीस निरीक्षक म्हणून यवतमाळ येथील ट्राफिक शाखेला कर्तव्यात असलेले ठाणेदार राजेश पुरी रुजू होणार आहे.नव्याने रुजू होणाऱ्या ठाणेदार यांचे कडून मारेगाव शहरासह तालुक्यात अवैध व्यावसायिकांना कसा चाप बसतोय हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


