विदर्भ सर्च न्यूज | (२४ सप्टें.) कोरोना संसर्गाने केवळ भारतालाच नाही तर सर्व जगाला ग्रासले. विविध देशांमध्ये आर्थिक वर्चस्वासाठी शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरु असताना कोरोनाने सर्व जगाला एक होऊन संसर्गाशी एकत्रितपणे लढण्यास बाध्य केले. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. अशावेळी सर्वांनी खांद्याला खांदा लावून सहकार्य केले तसेच निरंतर जागरुकता व जबाबदार वर्तन ठेवले तर कोरोनासारखी कितीही संकटे आली तरीही त्यांचा धैर्याने सामना करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.