🔹 कोठोडा नजीक घटना
विदर्भ सर्च न्यूज | जयप्रकाश वनकर
बोटोणी, (२४ सप्टें.) बोटोणी नजीक असलेल्या डुबली पोड येथील इसम करंजी वरून पायदळ येत असताना मागावून आलेल्या अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.या घटनेत तो जागीच गतप्राण झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारला सायंकाळी कोठोडा नजीक घडली.धडक मारलेल्या वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला.
दिनकर लखमा जुनगरी (६३) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे.
ते काल दिनांक २३ ला सायंकाळी ७ वा च्या दरम्यान करंजी वरून आपले वयक्तिक काम आटोपून बोटोनी कडे पायी निघाले. येण्यास वाहन उपलब्ध न झाल्याने पायदळ येताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक ही गंभीर स्वरुपाची असून यात दिनकर लखमा जुनगरी यांचा जागीच मृत्यू झाला. तूर्तास वाहनाचा शोध लागला नसून, पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.
मृतकाच्या पश्चात पत्नी १ मुलगी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. या या अपघाती घटनेने डूबली पोड येथील गावकऱ्यात मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.