🔹सतत पडणाऱ्या पावसामुळे घर कोसळले
🔹अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान
विदर्भ सर्च न्यूज | मारेगाव, (२६ सप्टें.) काल दि. २५ सप्टेंबर रोज शनिवारी रात्रीच्या दरम्यान हिवरा (मजरा) येथे मातीचा घरला पावसाचे पाणी मुरल्याने घर कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र यात अंदाजे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
गेल्या आठवडा पासून सतत पाऊस चालूच आहे. शनिवारी सांयकाळच्या दरम्यान हिवरा (मजरा) येथे मुसळधार पावसामुळे शंकर सुर्यभान वाघमारे रा.हिवरा (मजरा) मालकीचे असलेले मातीचे घर पावसाचे पाणी मुरून कोसळले, व अंदाजे दिड लाख रुपयाचे नुकसान झाले.
संबंधित अधिकारी यांनी पंचनामा करून उचित भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसान ग्रस्त शंकर सुर्यभान वाघमारे यांनी केली आहे. तसेच सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीत येणारे उत्पन्नाची मोठा प्रमाणात नुकसान होत आहे शेता मधील कापसीचे बोंड झाडालाच सडत आहे आणि सोयाबीन आडवे पडून सडत आहे. हवामान खात्याचा अन्दाज मानाने पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता दर्शवली आहे.