पोलीस पाटलाचे मानधन रखडले
🔹एका पाटलावर अनेक गावाचा भार
🔹घरच्या भाकरी ने मामाच्या गाई आखने सुरू
कुंभा :- कैलास ठेंगणे
मारेगाव तालुक्यातील पोलीस पाटलांचे मानधन मागील चार महिन्यांपासून रखडले आहे त्यात भरीस भर काही पोलिस पाटलाकडे अतिरिक्त गावाचा पदभार दिल्यामुळे पोलीस पाटील आर्थिक विवंचनेत अडकले आहे.
त्यामुळे घरच्या भाकरी वरून मामाच्या गाई हाकणे सुरू असल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया उमटत आहे.
ग्रामीण भागातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलाकडे पाहिले जाते .मागील काही वर्षापासून तालुक्यातील जवळपास 35 गावातील पोलीस पाटलाचे पदे रिक्त झाली. त्यामुळे काही पोलीस पाटलावर सदर गावांचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला . त्यामुळे त्यांची मोठी दमछाक होत आहे.
कोरोना काळामध्ये पोलीस, महसूल ,आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून पोलीस पाटलांनी कर्तव्य निभावले. मात्र मागील चार महिन्यापासून तालुक्यातील पोलीस पाटलाचे मानधन रखडले आहेत. आधीच तुटपुंज्या मानधनावर कर्तव्य पार पाळत असणाऱ्या पोलीस पाटला आर्थिक संकट कोसळले आहे. काही पोलीस पाटलांना अतिरिक्त गावांचा भार असल्यामुळे सदर पोलिस पाटलाला वारंवार त्या गावात भेटी द्यावे लागते . नागरिकांची कामे करून पोलीस व महसूल विभागाला नियमित माहिती द्यावी. त्यामुळे पोलिस पाटलांची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कटलेले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.