मारेगाव तालुक्यात डेंगू आजाराचा कहर
🔹एक मच्छर जिंदगी ले सकता है!
🔹प्रशासनाचे अपयश
मारेगाव :- कैलास ठेंगणे
तालुक्यांमध्ये मागील काही दिवसापासून डेंगू सदृश्य आजाराने चांगले डोके वर काढले . या आजारांमध्ये एका तीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याने नागरिक चांगलेच धास्तावले आहे .तर दुसरीकडे स्थानिक ग्रामपंचायती व आरोग्य यंत्रणा या सर्व प्रकाराकडे कानाडोळा करताना दिसत आहे.
कोरोणामुळे अनेकांचे जगणे कठीण झाले आहे. अजूनही कोरोणाचा कहर थांबलेला नाही. त्यामुळे आता कोरोणा बरोबरच इतरही आजारांनी नागरिक हैराण झाली आहेत. पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी मच्छरा चे प्रमाण वाढले आहे. मच्छरा चावण्यामुळे आता नागरिक आजारी पडत आहे.
मारेगाव तालुक्यातील 105 गावातील नागरिकाच्या सेवेकरिता 56 ग्रामपंचायतीची कार्यरत आहे .ग्रामपंचायतीमार्फत गावातील नाल्या साफसफाई करून गावात फोगिंग करणे आवश्यक आहे .याबाबतचे तसे आदेश वरवर देण्यात आले आहे. मात्र याची अंमलबजावणी झाली की नाही याकडे कुणाचेही लक्ष नाही.
तालुक्यातील जम्बो आरोग्य यंत्रणा असताना सुद्धा रुग्ण संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे .त्यामुळे आरोग्य यंत्रणा ढेपाळाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.