किन्हाळा येथे ऑनलाईन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम
मार्डी : प्रविण वाळके
आज बुधवारला जि. प. प्राथमिक शाळा किन्हाळा येथे पावसाळी आजार, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व मुलांचे आरोग्य याविषयी ऑनलाईन आरोग्य मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उदघाटन जी.प.सदस्या अरूणाताई खंडाळकर यांनी केले.अरुणताई यांनी आपल्या भाषणात शाळा बंद असून देखील दोन्ही शिक्षिका व पालक मिळून राबवत असलेल्या विविध उपक्रमाचे व ऑनलाईन शिक्षणाचे कौतुक केले. विशेष म्हणजे त्या पुर्णवेळ कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी आपल्या आरोग्यविषयक समस्यांचे निराकरण करून घेतले.
सतीश कोडापे वैद्यकीय अधिकारी मारेगाव यांनी मुलांच्या आरोग्यविषयक सखोल असे मार्गदर्शन केले व पालकांच्या विविध प्रश्नाचे समाधान देखील आपल्या मार्गदर्शनातून केले. डॉ राजेश चौधरी कुष्ठरोग तंत्रज्ञ यांनी देखील लोकांच्या मनात असलेल्या कुष्ठरोगविषयीचे विविध गैरसमज आपल्या मार्गदर्शनातून दूर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.सौ स्वातीताई शास्त्रकार(उपाध्यक्ष शा व्य स किन्हाळा )या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून मा शुभमभाऊ भोयर (सरपंच किन्हाळा )व मा. दर्शना मेश्राम (सचिव ग्रामसेविका) हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन कु चित्रा डहाके मॅडम तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन कु स्मिता देशभ्रतार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.