Type Here to Get Search Results !

खळबळजनक… बल्लारशा खुनातील आरोपीच्या वाहनाला मारेगावात अपघात

 बल्लारशा खुनातील आरोपीच्या वाहनाला मारेगावात अपघात


ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पसार
सिनेस्टाईल पाठलाग , करंजी व कारंजा येथून आरोपी गजाआड


मारेगाव : दीपक डोहणे
    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे एका युवकाचा खून करून इंडिगो या भरधाव वाहनाने पसार होतांना मारेगाव नजीक हे वाहन रस्त्याच्या कडेला मंगळवारी सकाळी पलटली.जखमींना लोकांनी वाहनाच्या बाहेर काढीत मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार केले.काही क्षणात  मागावून स्कार्पिओ वाहनातून जखमी आरोपी पसार झाले.बल्लारपूर येथील ठाणेदार उमेश पाटील यांनी आरोपींना पकडण्यासाठी जलदगतीने सूत्रे हलविले.मारेगावचे ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी लोकेशन घेत दिशा ठरविली.बल्लारपूर येथील पोलीस पथक मारेगावात पोहचले आणि सिनेस्टाईल पाठलाग करीत एकास करंजी तर दोघांना कारंजा येथून ताब्यात घेत बल्लारपूर ठाण्यात गजाआड केले.ही वास्तवात असलेली घटना मंगळवारी दिवसभर एखाद्या चित्रपटाला साजेल अशी घडली अन पोलिसांच्या धावपळीच्या कर्तव्याला फुलस्टॉप मिळाला.
मारेगावात अपघात


     प्राप्त माहितीनुसार , चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारशाह येथील सोमवारला रात्री स्क्वेअर पॉइंट बीअर बार समोर मिलिंद बोन्दाडे (३२) , सलमान शेख (२४) व गणेश जंगमवार (२४)यांचा धूंदीत असतांना वाद झाला.शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत होत थेट बीअर बॉटलने मिलिंद यांच्या डोक्यावर प्रहार केला.रक्ताच्या थारोळयात निपचित पडल्याने त्यास चंद्रपुर येथे दाखल केले व येथे मिलिंदचा मृत्यु झाला.

 दरम्यान , संशायित आरोपींनी पोबारा करीत यवतमाळच्या दिशेने चारचाकी वाहनाने कुच केले.भरधाव वेगाने येत असतांना मांगरुळ नजीक चालकाचे नियंत्रण सुटून राज्य महामार्गाच्या कडेला इंडिगो  आदळली.वाहनातील तिघे जखमींना धाव घेतलेल्या नागरिकांनी बाहेर काढले.जखमीनी थेट मारेगाव रुग्णालयात उपचार घेतले आणि मागावून आलेल्या स्कार्पिओ कार ने पसार झाले.

घटनेची गंभीरता लक्षात घेवून बल्लारपुर पोलिस स्टेशन चे ठाणेदार उमेश पाटील यांनी तपासचक्रे जलदगतीने हलवित मारेगाव पो.स्टे. चे पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार यांना सूचना केल्यानंतर नितिन खांदवे यांनी तपासगती मिळविली.काही वेळातच बल्लारपुर पोलिस पथक मारेगाव येथे दाखल झाले. आरोपींचा सिनेस्टाईल पाठलाग सुरु झाला.अवघ्या विस कि. मी. अंतर असलेल्या करंजी येथून एकास तर दोघांना कारंजा जी.अकोला येथून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत संशायित आरोपी सलमान मजीद खॉन ,गणेश जंगमवार,विष्णु पूण सर्व राहणार बल्लारपुर यांना गजाआड करण्यात आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्व:स सोडला.परिणामी अपघातग्रस्त  कार मारेगाव पोलिसात जप्त करण्यात आली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies