अभिषा गौरकार हिची शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी..!
अँरोस्पोस अभियांत्रिक पदविकेसाठी चेन्नई मध्ये प्रवेश , वणी उपविभागात रोवला मानाचा तुरा
मारेगाव : दीपक डोहणे
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे
या वैचारिक उदभोधनाचा बोध घेत व शिक्षणाची प्रचंड आवड असणाऱ्या आपल्या करड्या मेहनतीने मूळ गाव असलेल्या मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील व वणी येथे वास्तव्य असलेल्या कुशाग्र बुद्धीच्या अभिषा या विद्यार्थिनीने शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत वणी उपविभागात मानाचा तुरा रोवला आहे.महाराष्ट्रातील केवळ तीन विद्यार्थ्यांनी पदविका महाविद्यालयात प्रवेश घेतला असून अभिषाच्या प्रवेशाने ती कौतुकास पात्र ठरत आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाचे धडे गिरवीत विज्ञान शाखेची अभिषा ही सातत्याने तेरा ते चौदा तास अभ्यासात मग्न राहते.मनाचा दृढ़ निश्चय केलेल्या अभिषाचा तांत्रिक विषयात कमालीची रुची आहे.ही रुची कृतीत उतरवित आजतागायत व्हीआयटीईईई व हिट्स ईईई परीक्षेत प्रावीण्य मिळवित अँरो स्पोस अभियांत्रिकी करिता पात्र झाली.विशेष म्हणजे महाराष्ट्रातील केवळ तीनच विद्यार्थी पात्र झाले असतांना यात अभिषा आहे.चेन्नई येथील नामांकित विद्यालयात तिने प्रवेश मिळविला आहे.
भारतातील मिसाइल मँन भारतरत्न डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांनी ही पदवी प्राप्त केली होती.त्यांचे वैज्ञानिक विचार आणि त्यांच्या स्वप्नाला उजाळा देत अभिषाने स्वप्न साकार केले.तूर्तास शिक्षणाची व पदविका अभ्यासक्रमाची प्रचंड गोडी निर्माण झालेल्या अभिषा हिला आत्तापासूनच मोठ्या पॅकेज सह बड्या कंपनीची आँफर सुरू झाली आहे.मात्र शिक्षणाची व पदवी ची जम्बो वाटचाल केल्याशिवाय कंपनीचा विचार करणार नसल्याच्या भावना प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केल्या.अभिषा ही मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांचे पुतणे विजय गौरकार यांची कन्या आहे.