मारेगाव तालुका फणफणतोय
#आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज
कूंभा :- कैलास ठेंगणे मागील काही दिवसापासून परिसरातील गावागावात तापाचा आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. मात्र याकडे आरोग्य विभाग कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. तर दुसरीकडे स्थानिक ग्रामपंचायती सुद्धा गावात फॉगिग करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
कुंभा परिसरातील टाकळी, कोथूर्ला,मांगली, महागाव, सिंधी, रामेश्वर, गदाजी बोरी, नगारा, इंदिरा ग्राम, बंदर पोड सह आदी गावामध्ये डेगी सदृश्य आजाराने नागरिकांना सळो की पळो करून सोडले . प्रत्येक घरात रुग्ण आढळून येत आहे. आधी सर्दी व नंतर ताप येत आहे. उपचार केल्यानंतरही आजार बरा होत नसल्याने रुग्णांना वारंवार दवाखान्यात जावे लागते. या आजारात रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होत आहे . अनेक गोरगरीब रुग्ण न परवडणाऱ्या खाजगी दवाखान्याची वाट धरत आहे. यात लहान बालके सुद्धा तापाने फणफणत असल्याने पालक धास्तावले आहे त्यामुळे आरोग्य विभागाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.
स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
गावावातील प्रत्येक घरात तापाचे रुग्ण फणफणत आहे परिसरातील जवळपास प्रत्येक ग्रामपंचायतीकडे फॉगिंग मशीन उपलब्ध असताना फवारणी करण्याकडे ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.
उपचारातही दोन तालुक्याचा वाद
कुंभा परिसरातील गावे मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडली गेली आहे .मात्र कुंभा गावापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या राळेगाव तालुक्यातील दहेगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्रात परिसरातील नागरिक उपचारासाठी धाव घेत आहे .
हे रुग्णालय पूर्वीच रुग्णांनी फुल राहत असल्यामुळे येथील डॉक्टर परिसरातील रुग्णावर उपचार करताना का- कु करतात .कारण फॉलोअप घेताना अडचणी निर्माण होतात असे कारण पुढे करण्यात येत आहे तर दुसरीकडे मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र 11 किमी पडत असल्याने या केंद्रावर उपचार करण्यासरुग जात नाही . त्यामुळे स्थानिक आरोग्य विभागाने या सर्व प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे