जागतिक आदिवासी दिनाचा विरोध करणाऱ्या भाजप खासदार गजेंद्र सिंह यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करा_आदि चिंधूआढळ
प्रतिनिधी आशिष आढळ
पुणे वार्ताहर-'पत्रिका' या हिंदी वर्तमान पत्रात 'भाजपा' संसद ने किया विश्व आदिवासी दिवस का विरोध,बताया विदेशी एजेंडा'या मथळ्याखाली ९ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाली होती.या पार्श्वभूमीवर बिरसा क्रांती दल संघटनेचे पुणे जिल्हा संघटक मा चिंधू आढळ यांनी जागतिक आदिवासी दिनाचा विरोध करणाऱ्या भाजप खासदार गजेंद्र सिंह पटेल यांचा संघटनेच्या वतीने निषेध केला आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो)१९९३साली पर्यावरण संवर्धन, आदिवासी समाज व संस्कृती रक्षणार्थ ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हा पासून जगभरात विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. असे असताना मध्यप्रदेश राज्यातील बडवानी या आदिवासी क्षेत्राचे भाजपचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी जागतिक आदिवासी दिनाला विदेशी एजेंडा सांगून देशभरातील आदिवासी समाजाचा अपमान केलेला आहे. त्यानुषंगाने या भाजपा लोकसभा खासदाराचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी बिरसा क्रांती दल संघटनेचे पुणे जिल्हा संघटक मा चिंधू आढळ यांनी एका निवेदनाद्वारे मा. राष्ट्रपती आणि लोकसभा मा.अध्यक्ष यांच्या कडे केली आहे.