मारेगाव येथील कब्रस्थानाच्या ५लाख रुपयांच्या काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन
मारेगाव/दिलदार शेख
येथील कब्रस्थान ला जोडणाऱ्या रस्ता बांधकाम चे भूमिपूजन नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अनेक दिवसांपासून मारेगाव येथील कब्रस्थान ला जाणारा रस्ता कच्चा असल्याने दफनविधी साठी मुस्लिम समाजबांधवाना अडचण जात होती.ही समस्या लक्षात घेऊन नगर पंचायत तर्फे नागरी सुविधा निधी अंतर्गत पाच लक्ष रुपयांचा सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला.
कोलगाव रोड ते कब्रस्तान मुख्य प्रवेशद्वार पर्यंत 60 मिटर अंतर चा हा रस्ता असणार आहे.या कामाचे आज दिनांक 13आगस्ट रोजी भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी नगर पंचायत चे मुख्यधिकारी अरुण मोकळ,माजी आरोग्य सभापती खालिद पटेल व स्थापत्य अभियंता निखिल चव्हाण, याच्या हस्ते हा भूमी पुजन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मारेगाव कब्रस्तान कमिटी चे शरीफ अहेमद,शेख मोहम्मद भाई, , शेख रसूल भाई, एड. मेहमूद खान, शेख खलील सिकंदर, सैय्यद अहेफाज,इरफान शेख,वाहिद भाई सहित अनेक मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने मारेगाव नगर पंचायत चे मुख्यधिकारी अरुण मोकळ व स्थापत्य अभियंता निखिल चव्हाण यांचे आभार मानण्यात आले.