खापरी येथील मारहाण प्रकरणी जखमी युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू
सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील खापरी येथील कौटुंबिक वादाच्या शुल्लक कारणावरून केलेल्या मारहाणीत एका जखमी झालेल्या युवकाची मृत्यूची झुंज अखेर गुरूवार दि.१२ ऑगस्ट रोजी संपली. उपचारादरम्यान त्याचा नागपूर मेडिकल कालेज मध्ये मृत्यू झाला. रूपेश सुधाकर कुचनकर रा. खापरी असे त्या युवकाचे नाव आहे.
३ ऑगस्ट रात्रीच्या दरम्यान रूपेश याला बेदम मारहाण करण्यात आली होती.
या घटने प्रकरणी संशायित आरोपी संकेत हरिश्चंद्र पाचभाई वय वर्षे (२१) गौरव पाचभाई वय वर्षे (१९) संदीप उरवते रा.खापरी या तीन आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार सुरेंद्र टोगे हे करत आहे.