दांडगांव येथील बंधाऱ्यावरून पाण्यात उडी घेवुन २५वर्षीय युवकाची आत्महत्या
मारेगाव तालुक्यातील आत्महत्याचे सत्र थांबता थांबे ना
सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील दांडगांव येथील रहिवासी २५वर्षीय प्रफुल्ल गजानन मत्ते यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी शुक्रवारच्या रात्रीच्या दरम्यान गावा शेजारी असलेल्या बंधाऱ्यावरून पाण्यात उडी घेतली असता रात्रीच्या दरम्यान प्रफुल्ल याचा शोध घेतला असता लागला नसल्याने परत आज दि.१४ आँगस्ट रोज शनिवारला सकाळी शोध घेतला असता सकाळी ९वाजतच्या दरम्यान बंधाऱ्याच्या पाण्याखाली मृतदेह आढळून आला असुन प्रफुल्ल याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे . सध्या तरी आत्महत्याचे कारण समजू शकले नाही.
प्रफुल्ल यांच्या पश्चात आई वडील व एक विवाहित बहिण असा आप्त परिवार पाठि मागे आहे.