बिरसा क्रांती दल मावळ तालुका कार्यकारिणी गठित
प्रतिनिधी आशिष आढळ
पुणे वार्ताहर-बिरसा क्रांती दल संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा दसरथ मडावी सर यांच्या आदेशानुसार बिरसा क्रांती दल मावळ तालुका कार्यकारिणी गठित करून नियुक्ती पत्र देण्यात आली.आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, आत्मसन्मानासाठी, अस्तित्व,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त,शिक्षण, व संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती.ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.या संघटनेत मावळ तालुका उपाध्यक्ष पदी मा.सखाराम खामकर , संघटक मा.पै अमोल मदगे, सदस्य मा.एकनाथ झडे,मा समीर लोटे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित पुणे जिल्हा अध्यक्ष मा. दत्तात्रय कोकाटे सर, जिल्हा कार्याध्यक्ष मा. हरिभाऊ तळपे, पुणे जिल्हा महासचिव मा. किरण तळपे ,सचिव मा. शशिकांत आढारी ,पुणे जिल्हा संघटक मा .चिंधू आढळ,मा,आनंता मेठल, चाकण शहर अध्यक्ष मा. बारकू ठोकळ इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते या सर्व पदाधिकारी सदस्य यांची निवड झाल्याबद्दल मावळ तालुका आदिवासी जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.