मारहाण प्रकरणी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा; तिन हजार रुपये दंडही न्यायालयाने आरोपीस ठोठावला.
मारेगाव न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ पंकजा नेहारे
मारहाण प्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी मारेगाव श्री.एन.पी. वासाडे यांनी आरोपी रुपेश सुधाकर बोधाने रा.हटवांजरी ता.मारेगाव जि यवतमाळ यास सहा महीने कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा दि.. ०६ ऑगस्ट रोज शुक्रवारला शिक्षा सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे की मारेगाव तालुक्यातील पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी हा दि. दि.०७.०८.१८ रोजी सायंकाळी ०७.३० वाजता गावातील पानठेल्यावर खर्रा खाण्यासाठी गेला होता त्यावेळी पानठेल्या समोर काही लोक पत्ते खेळत होते वरुन फिर्यादी हा सुद्धा पत्ते खेळण्यासाठी बसला त्यावेळी आरोपीचे वडील हे येवुन पत्ते उचलले.पत्ते का उचलले म्हणून विचारले असता आरोपीने पानठेल्यावरील खर्रा घोटण्याची पाठी घेवुन फिर्यादी ला चेहऱ्यावर, हातावर मारले त्यामुळे फिर्यादचे डावे डोळ्याचे खाली मार लागला व रक्त निघाले तसेच आरोपीने शीवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली वरुन फिर्यादीने पोलीस स्टेशन ला रिपोर्ट दिला पोलीसांनी आरोपी विरूद्ध भा.द वि. चे कलम ३२४,५०४,५०६ ,भा.द.वि. अंतर्गत गुन्हा नोंद केला सदर गुन्हाचा जमादार रामकृष्ण वेटे यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी,डाँक्टर पी.एस.वानखडे व तपास अधिकारी जमादार रामकृष्ण वेटे ब.न.६८३ यांचे सह नऊ साक्षदारांचे पुरावे नोंदविण्यात आले साक्षदाराचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपींस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली यात सरकारी पक्षाचे वतीने विशेष सहाय्यक सरकारी वकील श्री पी डी कपुर व कोर्ट पैरवी जमादार ढुमणे यांनी काम पाहीले