Type Here to Get Search Results !

युवकात कंपनी विषयी असंतोषाचे वातावरण निर्माण.

युवकात कंपनी विषयी असंतोषाचे वातावरण निर्माण.

 नोकरी न मिळाल्यास आत्मदहन करण्याची परवानगी द्या, 

झरी तालुक्यातील सुशिक्षित प्रकल्पग्रस्त युवकांचे 2 आगस्ट पासून उपोषण सुरू आहे.
तालुक्यातील बी. एस. इस्पात व आर.सी.सी.पी.एल. सिमेंट प्लांट या कंपनी विरुद्ध रोजगारासाठी प्रकल्पग्रस्त युवकांचा लढा सुरू आहे. उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून सुद्धा मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रशासन तयार नाही. झरी तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी आप-आपल्या परीने निधी गोळा करून उपोषणाचा खर्च उचलत आहे. या उपोषणाला अनेक राजकीय पक्ष, कामगार संघटना, कृषि पदविधर संघटना, समाजसेवक, पत्रकारांनी पाठिंबा दर्शवून अनेकांनी भेटी देऊन आपआपली प्रतिक्रिया दर्शवली आहे. बेरोजगाराचे हे उपोषण दडपण्यासाठी मुकुटबन पोलीस स्टेशन ठाणेदारा मार्फत उपोषणकर्त्या युवकांना गुन्हा दाखल करण्याची धमकी सुद्धा देण्यात आली होती. यामुळे अनेक युवकांना रोजगार नाही मिळाले व उपासमाराची परिस्थिति निर्माण झाली तर उद्या उपाशी पोटी आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भिती होती. मात्र युवकांनी संयम ठेवत ठाणेदार यांची तक्रार पोलीस अधिक्षकाला दिली त्यामुळे त्यांचे बिंग फुटले.
झरी तालुक्यात अनेक मोठ मोठे प्रकल्प येऊन आहे. यात कोळसा खदान, सिमेंट उद्योग, डोलोमाईन्स, चुना फक्ट्री आहे. मात्र तरी सुद्धा येथील युवक बेरोजगार आहे. कंपनी मध्ये काम करण्यासाठी इंजिनिअरिंग , एम.बी.ए. आयटीआय, बी.एस.सि. ऍग्री, अनेक डिप्लोमा डिग्री होल्डर आहे. मात्र त्यांना जाणून बुजून डावलून बाहेर राज्यातील लोकांचा भरणा केला जात आहे. काही मोठं मोठ्या कंपनी जॉब कॉन्सल्टंसीच्या माध्यमातून भरणा करीत आहे. तर काही प्रशासनातील अधिकारी आपल्या नातेवाईकांना लावत आहे. स्थानिकांचे शैक्षणिक पात्रतेची माहिती घेऊन सुद्धा कंपनी स्थानिकांना बोलवत नाही. त्यांना गेट बाहेर उभे करून साहेब आत नाही, असे सांगतात. अनेक मोठं मोठे उद्योग आल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर प्रदूषणाचे परिणाम सुद्धा जाणवत आहे.
स्थानिक लोक हे चोरी करू शकतात, ते बरोबर काम करू शकत नाही, ते आपल्या कंपनी मधील कोणतीही घटना बाहेर सांगून आपली बदनामी करतात, ते आपल्याला रिस्पेक्ट देत नाही असा समज सद्या काही कंपनी मधील अधिकारी करीत आहे. मात्र कंपनी मध्ये काम देण्या अगोदरच त्यांनी हा विचार करून स्थानिकांना डावलून शासन निर्णयाचा अपमाण करीत आहे. कंम्पनी सुरू झाल्यानंतर जनसुनावणी ची अमलबजावनी करीत नाही. व प्रशासन सुद्धा त्यांच्या या प्रकाराला डोळेझाक करताना दिसत आहे.
आज तिसऱ्या दिवशी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार मार्फत झरी तहसील कार्यालयात ़ मीटिंग आयोजित केली मात्र उपोषणकर्त्या युवकांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन चर्चा करावी अशी विनंती केली. एका कंपणीला युवकांनी निवेदन दिल्या नंतर उपोषणाकर्त्या व पाठिंबा देणाऱ्या युवकांना डावलून इतर लोकांचा भरणा करताना आढळले आहे. अशी माहिती युवकांना मिळत आहे. जर असा लपंडाव खेडत असाल तर आम्ही सर्व युवक त्या कंपनी समोर आत्मदहन व कंपनी करीत असलेले काळे धंदे उघड करू असे सुद्धा पाठिंबा देणाऱ्या युवकांकडून सांगण्यात आले. कायदा सुव्यवस्था चे पालन करून हे उपोषण सुरू आहे. युवक संतप्त झाले आहे. युवकात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या ८०% जि.आर. नुसार जर रोजगार दिला नाही तर युवक कोणत्याही मार्गाला जाण्याची शक्यता आहे. आणि समोरिल होणाऱ्या परिणामास प्रशासन कंपनी उद्योग हे जबाबदार राहील असे उपोषणकर्त्यांनी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies