जागतिक आदिवासी दिना निमित्त ९ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका यांची मागणी
प्रतिनिधी आशिष आढळ
पुणे जिल्हा वार्ताहर-बिरसा क्रांती दल ता.आंबेगाव जि.पुणे यांनी आज दि ४-०८-२०२१ रोजी आंबेगाव तालुका तहसीलदार व नायब तहसीलदार मा श्री ए.बी.गवारी साहेब व गटविकास अधिकारी मा श्री जालिंदर बा.पठारे साहेब यांना निवेदन देऊन विश्व जागतिक आदिवासी दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी जमातीकडून मोठ्या उत्साहाने दिनांक ०९ ऑगस्ट रोजी प्रत्येक वर्षी साजरा केला जातो ही मागणी महाराष्ट्रातील सुमारे १०% लोकसंख्या असलेल्या आदिवासी जमातीकडून केली जात असल्याने दिनांक ०९ ऑगस्ट २०२१ रोजी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले, यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल आंबेगाव तालुका उपाध्यक्ष मा सागर भवारी सर, कोषाध्यक्ष मा. संदिप भवारी, संघटक मा. विनायक धादवड , अजित गवारी,महिला आघाडी आंबेगाव तालुका उपाध्यक्षा सौ गौरी चपटे,मा. जिल्हा परिषद सदस्या सौ जनाबाई उगले उपस्थित होते.