धक्कादायक! विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचार दरम्यान मुत्यु
मारेगाव तालुक्यातील वसंतनगर येथील घटना
तालुक्यातील आत्महत्याचे सत्र थांबता थांबेना
तालुका प्रतिनिधि / पंकज नेहारे
मारेगाव तालुक्यातील वसंतनगर येथील महेश दयालाल राठोड या २६ वर्षीय युवा शेतकऱ्याने २७जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास राहत्या घरी उंदीराचे औषध राहत्या घरी प्राशन केल्याची घटना उघडकीस येता कुटुंबातील सदस्यांनी उमरी येथील रूग्णालयात दाखल केले असता येथील प्राथमिक उपचार करून डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नागपूर येथील पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नागपूर येथे उपचार सुरू असताना ३ ऑगस्ट रोज मंगळवारला रात्रीच्या ११वाजताच्या सुमारास उपचार दरम्यान नागपूर येथील रुग्णालयात महेश याच्या मुत्यु झाला असुन महेश याच्या आत्महत्याचे कारण सध्या तरी कळू शकले नाही .महेश यांच्या पश्चात आई,वडील पत्नी व बराच मोठा अपत्य परिवार पाठी मागे आहे.