आजंती पारधी बेड्यावर मुलभुत सुविधा नसल्याने पारधी समाजाचे तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण
नेर तालुक्यातील आजंती पारधी बेडा हा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असुन गेल्या अनेक वर्षापासून येथील पारधी समाज आजंती मोझर रस्त्याला लागून असणाऱ्या शासनाच्या जागेवर राहत आहोत त्या ठिकाणी आम्हाला कोणतीही आवश्यक व मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेली नाही, नसल्याने देशाचे नागरिक म्हणून पुढारलेल्या समाजाच्या सोबत स्वतःचा विकास साधण्याचा पूर्ण अधिकार आहे किंबहुना तशी संधी शासन व प्रशासनाने उपलब्ध करून द्यावयास पाहिजे परंतु स्थानिक प्रशासन आमच्या
मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पारधी बेडयावर सुविधा नसल्याने जेणेकरून आम्ही कंटाळून परत जंगलात राहण्यास जावे आमच्या कायमस्वरूपी रहिवासी प्रयोजना करता जागेचा व घरकुलाचा प्रश्न त्यासोबतच विज रस्ता व पाणी ह्या मूलभूत गरजांचा प्रश्नसुद्धा तसाच राहला याबाबीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी कुठलेही गंभीर दखल न घेतल्याने , यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधी पारधी बेड्याच्या समस्या विषय अनेक वेळा निवेदन देवून सुध्दा याकडे समस्या कडे दुर्लक्ष केले आखिर नाईलाजाने आजंती पारधी बड्यातीली नागरिकांनी गुरुवार दिनांक१२ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसण्याचा निर्णय तहसीलदार यांना निवेदन सादर तहसील कार्यालय समोर उपोषण सुरू केले आहे.
आजंती पारधी बेड्याच्या समस्या दूर करणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले.