अल्पवयीन मुलीचा विनयभंग; गुन्हा दाखल
Crime News : मारेगाव पोलीस ठाणे अंतर्गत हिवरी गावात घडली घटना
सचिन मेश्राम
मारेगाव: तालुक्यातील हिवरी येथील किरणा घेण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीशी युवकाने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हात पकडून पिडीत मुलीला रामा डवरे यांच्या बैल गोठ्यात नेवून गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना दि १३आँगस्ट रोज शुक्रवाराला रात्रीच्या आठ वाजताच्या दरम्यान घटना घडली असल्याने तक्रार दाखल करण्यासाठी पिडीत कुटुंबाकडे कुठलेही साधन नसल्याने याबाबत दि. १४ आँगस्ट रोजी मुलीच्या वडिलांनी मुलीला सोबत घेवून ११वाजता मारेगाव पोलीस स्टेशन गाठत पिडीत मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील हिवरी येथील १६ वर्षीय मुलगी किरणा सामान घेऊन येत असतांना गावातीलच २६ वर्षीय युवकाने अल्पवयाचा गैरफायदा घेत वाईट उद्देशाने पिडीताचा हात पकडला व गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी २६ वर्षीय संशायित आरोपी ईश्वर कवडू आस्वले याच्यावर कलम ३५४, ३५४(अ), भादवि सह कलम ८, १२ बालकांचे लैंगिक अपराघ संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशायित आरोपीला अटक केली असुन याबाबत पुढील तपास मारेगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक जगदीश मंडलवार व उपनिरीक्षक अमोल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार पुढील करीत आहेत.