आ. संतोष बांगर साहेबांनी जागेवरच सोडवल्या सकल धनगर समाजाच्या विविध मागण्या....!!!
प्रतिनिधी./तुकाराम भरकाडे
आज औंढा येथे कार्यक्रमानिमित्त आलेले हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर यांना सकल धनगर समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले तेव्हा आमदार बांगर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जागेवरच फोन द्वारे वनक्षेत्रात मेंढ्यात चराईसाठी क्षेत्र राखून ठेवण्यात यावे गायरान जमिनीवर तलाव व सरकारी नाले असलेल्या पाणी स्त्रोतां वर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी परवानगी द्यावी वनक्षेत्र शिवाय इतर ठिकाणी मेंढ्यांना चरण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशा सूचना दिल्या तसेच मेंढपाळ वरील हल्ल्यांबाबत विधानसभेत प्रश्न उचलण्याची ग्वाही आमदार बांगर यांनी सकल धनगर समाजास दिली यावेळी,
जि.प.समाज कल्याण सभापती फकीर रावजी मुंडे, जि.प. सदस्य विठ्ठल राव चौतमाल ,उपजिल्हा प्रमुख परमेश्वर मांडगे , जी. डी. मुळे, नगरसेवक रामभाऊ कदम, महिला जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, अनिल भाई देशमुख, श्रीराम दादा राठी, अनिल देव, वैजनाथ पावडे, विश्वनाथ गवारे, गंगाधरराव पोले, लखन शिंदे, विठ्ठल काचगुंडे , सारिका ताई चांदणे, बाळू मानमोडे, शंकर आळसे, गजानन नाईक, विलास काचगुंडे, नारायण खुणे,
व मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते..