आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ता प्रल्हादजी लिहीतकर यांचे निधन
मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता प्रल्हाद जी लिहितकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
सचिन मेश्राम
मारेगाव येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता प्रल्हाद जी लिहितकर यांचे प्रभाग क्रमांक ११मधील राहत्या घरी शनिवारला दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर मारेगाव मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार
करण्यात आले. लिहितकर यांनी विद्यार्थीदशेपासूनच आंबेडकरी चळवळीत स्वत:ला झोकून दिले होते. परंतु त्यांना दिर्घकाळ आजाराचा सामना करताना अखेर त्यांचे आज दि. १४आँगस्ट रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी ३मुले (विवाहित)२विवाहित मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.